नळदुर्ग : आरळी बुद्रुक येथील शिवारातील शेतात जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग दत्तु मोहिते (वय ४८ वर्षे, रा. आरळी बु.) हे दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आत्याच्या मुलासह शेतात गेले होते. त्यावेळी बाळासाहेब उर्फ शाहुराज सिद्राम सोमवंशी (रा. आरळी बु.) यांनी त्यांना शेतात जाण्याचे कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले.
या घटनेनंतर पांडुरंग मोहिते यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाळासाहेब सोमवंशी यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.