तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील एका गावात ३८ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही २०१८ पासून घरी असताना गावातीलच एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर आरोपीने या अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील पीडित तरुणीला दिली.
या घटनेने घाबरलेल्या पीडित तरुणीने २३ नोव्हेंबर २०२४ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६(२)(एन), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.