• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बोगस गुंठेवारी प्रकरणी दहा जणांची पडताळणी समिती नियुक्त

समितीमध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचा समावेश

admin by admin
October 20, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात बोगस गुंठेवारी – चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात झालेल्या बेकायदेशीर आणि चुकीच्या गुंठेवारी प्रकरणी संचिकेची पडताळणी करण्यासाठी दहा जणांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यात ज्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यालाच नियुक्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात जवळपास १३४ जणांचे बेकायशीर आणि चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी करून लेआऊट मंजूर करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकरणात भूखंडाचे सर्व्हे मधील स्थान दर्शवणारा मोजणी नकाशा नसल्याने व काही प्रस्तावामध्ये कच्चा रेखांकन नकाशा नसल्याने मंजूर विकास योजनेमध्ये प्रस्तावाअंतर्गत भूखंडाचे निश्चित होत नाही. तसेच काही संचिकांमध्ये मूळ मालक यांच्याकडील क्षेत्रामध्ये १० टक्के जागेचे क्षेत्र हस्तांतरित न करता गुंठेवारी अंतर्गत भूखंड नियमितीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.

तसेच रद्द केलेल्या रेखांकन प्रस्तावास मंजुरी देणे, बांधकामाचे विकास शुल्क न आकारणे, मूळ मालकाचे नावे गुंठेवारी करणे, खरेदीदार व्यक्तिरिक्त इतरांचे नावे गुंठेवारी करणे, भोगवटदार वर्ग २ चे जमिनीचे विभाजन करून गुंठेवारी करणे, बेकायदेशीर बांधकाम नियमित करणे, बांधकामाचे अधिमूल्य न आकारणे, विकास शुल्कात ५० टक्के सवलत देणे आदी गैरव्यवहार करण्यात आले आहेत. तसेच गुंठेवारी नियमाधिन केलेल्या परवानगीची प्रत जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास पाठवण्यात आली नाही. काही प्रस्तावात ५० टक्के सूट देण्यात आली असली तरी उर्वरित रक्कम देखील नगर पालिकेत जमा झाली नाही.

या गैरव्यवहार प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी वसुधा फड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, नगर अभियंता भारत विधाते, लिपिक गोरोबा आवचार , स्थापत्य अभियंता दत्तात्रय कवडे यांचा समावेश आहे. सात दिवसाच्या आत खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली आहे. भादंवि १८६० चे कलम १६६, ४०९ प्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा का दाखल करू नये ? अशी विचारणा देखील करण्यात आली आहे.

धाराशिव पालिकेतील कथित बोगस गुंठेवारीचे प्रकरण धाराशिव लाइव्हने सर्वप्रथम उघडकीस आणले होते. याप्रकरणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असता, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांना विचारणा केली असता, आता दोषी कर्मचाऱ्यांना नोटीस बजवण्यात आली आहे.

दरम्यान, पालिकेकडे पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ मागितले होते. हा टोलवाटोलवीचा प्रकार असल्याची चर्चा पालिका परिसरात सुरु होती. याप्रकरणी धाराशिव लाइव्ह ने बातमी प्रकाशित करताच, अखेर दहा जणांची समिती नेमण्यात आली आहेत,. त्यात मनोज कल्लूरे, संतोष गायकवाड, गोरख रणखांब, उल्हास झेंडे, महादेव निंबाळकर, मुदस्सर उस्मान सय्यद, गोरोबा आवचार, राजेंद्र देवकाते, विनोद रोकडे, शाम गायकवाड यांचा समावेश आहे. पैकी गोरोबा आवचार यांची समितीमध्ये नेमणूक करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण गुंठेवारी प्रकरणी ज्या चार जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यात गोरोबा आवचार यांचा समावेश आहे.

ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे , त्यांनाच पडताळणी समितीत घेतल्याने बोगस गुंठेवारी प्रकरणाची निपक्ष चौकशी होण्याची शक्यता दुरावली आहे. केवळ आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी खुलासा विचारला म्हणून मुख्याधिकारी वसुधा फड कागदी घोडे नाचवत आहेत आणि आरोपीना पाठीशी घालत आहेत, हे यातून दिसून येत आहे.

धाराशिव नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या कार्यकाळात एकूण १३१४ गुंठेवारी फाईल्स मंजूर झाल्या असून पैकी १३४ बेकायदेशीर आहेत. या सर्व गुंठेवारीची पडताळणी करण्यासासाठी दहा जणांची समिती नेमण्यात आली आहे.परंतु ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला, ते गोरोबा आवचार यांचा यांचा पडताळणी समितीमध्ये समावेश झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी कोणती करवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

Previous Post

परंडा : शेतकऱ्याकडून लाच घेताना विस्तार अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी चतुर्भुज

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group