वाशी – वाशी तालुक्यातील गोलेगाव येथे प्रॉपर्टीच्या वादातून एका ५५ वर्षीय महिलेची हत्या करून तिचे प्रेत प्लॅस्टिकच्या बॅरेलमध्ये लपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा गौतम गायकवाड (वय ५५, रा. गोलेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. शुभम गौतम गायकवाड (वय २४, रा. गोलेगाव, ह.मु. पोलीस लाईन धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंजली विलास भोसले, निकीता विकास भोसले, सचिन सुभाष शिरसाट, दिक्षा सचिन शिरसाट, सरस्वती सुभाष शिरसाट (सर्व रा. अजिंठानगर, पुणे), बालाजी मगर (रा. वाघोली), दिपक वाघमारे, वैषाली दिपक वाघमारे (रा. पुणे) या आठ जणांनी मिळून रेखा गायकवाड यांची हत्या केली आहे.
दि. ८ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत आरोपींनी प्रॉपर्टीच्या वादातून रेखा यांना ठार मारले. त्यानंतर त्यांचे प्रेत गोलेगाव शिवारातील शेतात असलेल्या घरात प्लॅस्टिकच्या बॅरेलमध्ये टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भादंवि कलम १०३ (१), २३८, १८९(२), १९१(१), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.