• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरच्या लखन देडे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलीस तपासात दिरंगाई

admin by admin
December 16, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अणदूरच्या लखन देडे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलीस तपासात दिरंगाई

न्यायाच्या प्रतीक्षेत राधाबाई देढे

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी  : चव्हाणवाडी (अणदूर) येथील ३१ वर्षीय लखन मछिंद्र देडे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. देडे हे गेल्या दोन वर्षांपासून सावरगाव – बोबडेवाडी येथील जीवन बोडके यांच्याकडे सालगडी म्हणून काम करत होते. ४ मे २०२४ रोजी ते अचानक बेपत्ता झाले. त्यांची आई राधाबाई देडे यांनी ७ मे रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी ९ मे रोजी ‘मिसिंग’ची तक्रार दाखल केली.

१७ मे रोजी लखन यांची बहीण सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली असता, धक्कादायक माहिती समोर आली. लखन यांना ९ मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. १४ मे रोजी त्यांचा बेवारस म्हणून अंत्यविधी करण्यात आल्याचे सिव्हिल हॉस्पिटल चौकीच्या पोलिसांनी सांगितले. लखन हे सुरतगाव येथे आढळून आले होते आणि कुणीतरी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

मयत लखन यांच्या पत्नीचे एका अज्ञात इसमाशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या मोबाईलमध्ये पत्नी आणि तो अज्ञात इसम यांचे फोटो सापडले आहेत. त्यामुळे लखन यांचा खून करण्यात आल्याचा संशय त्यांची आई राधाबाई देडे यांनी व्यक्त केला आहे.

तामलवाडी पोलीस या प्रकरणाचा जाणीवपूर्वक तपास करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सोलापूर सिव्हिलमध्ये लखन यांना दाखल केले तेव्हा तेथील पोलिसांनी तामलवाडी पोलिसांशी संपर्क साधला होता, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, ७ महिने उलटूनही या प्रकरणाचा कोणताही तपास केला जात नसल्याने कुटुंबियांमध्ये नाराजी पसरली आहे.

Previous Post

तानाजी सावंतांचं दुःख मोठं की पत्रकारांचं?

Next Post

वाशीत प्रॉपर्टी वादातून महिलेची हत्या, प्रेत बॅरेलमध्ये लपवले

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वाशीत प्रॉपर्टी वादातून महिलेची हत्या, प्रेत बॅरेलमध्ये लपवले

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!