उमरगा: उमरगा तालूक्यातील मुरूम पोलीस स्टेशनचे सपोनि संदीप दहिफळे यांच्यावर आता वीज चोरीचा आरोप झाला आहे. गुटखा तस्करी आणि मटक्यासाठी हप्ता घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या राहत्या बंगल्यात वीजचोरी उघडकीस आली आहे.
पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी इमारत आणि सपोनि दहिफळे यांच्यासाठी बंगला बांधण्यात आला आहे. इमारतीतील आठ पोलीस कर्मचारी नियमित वीज बिल भरतात, मात्र सपोनि दहिफळे यांच्या बंगल्यात वीज मीटरच नाही. विजेच्या पोलवर आकडा टाकून ते चोरून वीज वापरत असल्याचे उघड झाले आहे.
मात्र, महावितरणचे अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ आहेत. महावितरणचे उपअभियंता भ्रष्ट असल्याने सपोनि दहिफळे यांच्यावर कारवाई होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.या घटनेमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महावितरणचे अधिकारी आता तरी जागे होणार का ? वीज चोरी प्रकरणी कारवाई करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.