वाशी – वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करताना एका पिकअप चालकाला अटक करण्यात आली आहे. सोफीयान मंजूर कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव असून तो परंडा तालुक्यातील रहिवासी आहे.
५ जानेवारी २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कुरेशी हा एच २५ पी ३९८६ क्रमांकाच्या पिकअपमध्ये २३ गोवंशीय वासरे घेऊन भुम कडून धाराशिवकडे जात होता. पार्डी शिवारातून जाताना पोलिसांनी त्याला अडवले असता पिकअपमध्ये १५ वासरे मृत अवस्थेत आढळून आली. उर्वरित वासरे ही दाटीवाटीने बांधलेली होती आणि त्यांच्यासाठी चारापाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.
याप्रकरणी सुदर्शन सुभाष पंडीत यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी कुरेशी विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागण्याबाबतचा कायदा आणि प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.