अचलेर – लोहारा तालुक्यातील अचलेर येथील जिल्हा परिषद शाळेत एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रणव उर्फ प्रविण हिप्परगेकर यांनी विनोद सखाराम माने यांना शेतातील डहाळे उपसून आणल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेची फिर्याद विनोद माने यांनी मुरुम पोलीस ठाण्यात दिली असून, त्यानुसार पोलिसांनी प्रणव हिप्परगेकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 118(1), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रणव हिप्परगेकर आणि फिर्यादी विनोद माने हे दोघेही अचलेर येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.