मुरुम: कडोदरा येथे शेत रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर व्यंकट हत्तरगे (वय ३० वर्षे, रा. कडोदरा) यांना, त्यांच्या आईला व बहिणीला सचिन गोविंद हत्तरगे, गोविंद राजेंद्र हत्तरगे, रुक्मीणीबाई गोविंद हत्तरगे, स्वप्निल गोविंद हत्तरगे, शारदाबाई बालाजी काळे (सर्व रा. कडोदरा) यांनी मारहाण केली.
दि. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास कडोदरा शिवारातील शेत गट क्रमांक १८४ मधील सामाईक बांधालगत ही घटना घडली. आरोपींनी शेत रस्त्याच्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून ज्ञानेश्वर हत्तरगे यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर हत्तरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११५(२), १८९(२), १९१(२), १९०, ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.