• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अनुसूचित जातीच्या महिलेची छेडछाड; दोन आरोपींना ६ वर्षांची शिक्षा, कळंब न्यायालयाचा निकाल

admin by admin
May 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब: अनुसूचित जातीच्या महिलेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाने ६ वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी दिनांक ०८ मे २०२६ रोजी हा निकाल दिला. भैरवनाथ गुणवंत दिवाणे आणि प्रदीप बिभीषण दिवाणे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

कळंब तालुक्यातील येरमाळा येथे ७ फेब्रुवारी २०२४ रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी महिला ही मातंग समाजाची तर आरोपी हे मराठा समाजाचे आहेत, याची माहिती आरोपींना होती. पीडित महिला स्वयंपाक करत असताना आरोपी क्रमांक १ भैरवनाथ दिवाणे आणि आरोपी क्रमांक २ प्रदीप दिवाणे यांनी तिथे जाऊन महिलेच्या अंगावरील गाऊनला वाईट उद्देशाने हात लावून झोंबाझोंबी केली. तसेच आरोपी क्रमांक १ याने महिलेचा डावा हात वाईट हेतूने धरून विनयभंग केला.

यानंतर आरोपी क्रमांक २ याने महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. पीडित महिलेने आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी आरडाओरड केली असता, आरोपींनी तिला ‘आमच्या दोघांसोबत नाही आली तर तुला, तुझ्या पतीला आणि मुलाला जिवंत ठेवणार नाही’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

या गंभीर प्रकारानंतर येरमाळा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी करून कळंबच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडितेची साक्ष आणि इतर साक्षीदारांचे पुरावे अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी भैरवनाथ दिवाणे आणि प्रदीप दिवाणे यांना विविध कलम ३५४ आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दोषी ठरवले. त्यांना ६ वर्षांची शिक्षा व प्रत्येकी १००० रुपये दंड सुनावण्यात आला आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांनी भक्कम बाजू मांडली.

Previous Post

तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

Next Post

‘तू तक्रार कशी घेते तेच पाहतो’; भूम पोलीस ठाण्यात राडा, महिला पोलिसाला धमकी

Next Post
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘तू तक्रार कशी घेते तेच पाहतो’; भूम पोलीस ठाण्यात राडा, महिला पोलिसाला धमकी

ताज्या बातम्या

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

June 23, 2026
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

June 23, 2026

अखेर स्थगिती उठली; ओमराजेंच्या कामाचा धडाका सुरू, पत्रकबाजांवर सोमनाथ गुरव यांचा हल्लाबोल

June 23, 2026
निष्ठेची मशाल विझवून सत्तेचा धनुष्यबाण हाती; ओमराजेंची नवी राजकीय परीक्षा !

कालच शिंदेसेनेत एन्ट्री, आज धाराशिवसाठी १८ कोटींची लॉटरी!

June 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात थरार! तरुणावर कोयत्याने सपासप वार, ‘गालिब नगर’च्या दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group