• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कत्तलीसाठी घेऊन जाणारी १० लाखांची गोवंशीय जनावरे पकडली; लोहारा पोलिसांची कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल

तावशीगड शिवारात कारवाई; दोन वाहनांसह १३ जर्सी गायी आणि एका वासराची सुटका

admin by admin
May 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा  : कत्तलीच्या उद्देशाने दोन वाहनांमध्ये कोंबून अत्यंत क्रूरपणे वाहतूक केल्या जात असलेल्या १३ जर्सी गायी व एका वासराला लोहारा पोलिसांनी गुरुवारी (ता. ७) तावशीगड शिवारात कारवाई करत जीवदान दिले. या धडक कारवाईत जनावरे आणि दोन वाहनांसह एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तिघांवर लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेबुब कलीम सवार (वय २४), महेश ज्ञानेश्वर स्वामी (वय १९) आणि आमीन कुरेशी (तिघेही रा. लोहारा, ता. लोहारा, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माकणी ते तावशीगड जाणार्‍या रस्त्यावर तावशीगड शिवारातील महादेव मंदिराजवळ गुरुवारी (ता. ७) साडेतीन वाजेच्या सुमारास पोलीस गस्तीवर होते. यावेळी संशयास्पद वाटलेली एक पिकअप (क्र. एमएच १३ एएन ६८७५) आणि अशोक लेलँड (क्र. एमएच २४ बीडब्ल्यू १५५३) या दोन वाहनांना थांबवून पोलिसांनी त्यांची तपासणी केली.

यावेळी या दोन्ही वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे गोवंशीय जनावरे भरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. ही सर्व जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने आणि बेकायदेशीररित्या घेऊन जात असल्याचे तपासात उघड झाले.

१० लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी दोन्ही वाहनांमधून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या १३ जर्सी गायी व एक वासरू यांची सुटका केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने असा एकूण १० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी लोहारा पोलिसांच्या वतीने सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(डी)(ई)(एच) सह महाराष्ट्र पोलीस कायदा (मपोका) कलम ११९ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) अन्वये तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोहारा पोलीस करत आहेत.


Previous Post

‘तू तक्रार कशी घेते तेच पाहतो’; भूम पोलीस ठाण्यात राडा, महिला पोलिसाला धमकी

Next Post

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; उमरग्यात दुचाकी तर वाशीत पवनचक्कीची केबल लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; उमरग्यात दुचाकी तर वाशीत पवनचक्कीची केबल लंपास

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!