• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; उमरग्यात दुचाकी तर वाशीत पवनचक्कीची केबल लंपास

उमरग्यात मंगल कार्यालयासमोरून दुचाकी लंपास

admin by admin
May 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा  : शहरातील ओम बालाजी मंगल कार्यालयासमोरून भरदिवसा एका अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. ७) उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर भाऊराव सुरवसे (वय ५७, रा. जुनी पेठ, उमरगा, जि. धाराशिव) हे कामानिमित्त शहरात गेले होते. त्यांनी आपली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एमएच २५ एएन ४०१७) ही दुचाकी बुधवारी (ता. ६) दुपारी १२ ते २ वाजेच्या सुमारास ओम बालाजी मंगल कार्यालय येथे उभी केली होती. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून अंदाजे २३ हजार ९५५ रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी दिगंबर सुरवसे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


वाशीत पवनचक्कीची ५ लाखांची केबल चोरी; कंपनीचे ३४ लाखांचे नुकसान

वाशी : खानापूर शिवारातील पवनचक्कीची तब्बल ५ लाख रुपये किमतीची केबल चोरून नेल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी केलेल्या या कृत्यामुळे संबंधित कंपनीचे सुमारे ३४ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर शिवारातील गट क्रमांक १४० मध्ये पवनचक्की कंपनीचा केटी/०१ हा पॉईंट आहे. या ठिकाणाहून ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २२ मीटर लांबीचे रोटा रेटर केबल वायरचे एकूण २४ बंडल (किंमत ५ लाख रुपये) चोरून नेले. या चोरीमुळे आणि तोडफोडीमुळे पवनचक्की कंपनीचे तब्बल ३४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी बाळाजी बाळासाहेब मोरे (वय २७, रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी गुरुवारी (ता. ७ मे) दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) आणि ३२४(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मोठ्या चोरीचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत.

Previous Post

कत्तलीसाठी घेऊन जाणारी १० लाखांची गोवंशीय जनावरे पकडली; लोहारा पोलिसांची कारवाई, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

तुळजापुरातील कायदा-सुव्यवस्था ढासळली?; वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांविरोधात संताप

Next Post
तुळजापुरातील कायदा-सुव्यवस्था ढासळली?; वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांविरोधात संताप

तुळजापुरातील कायदा-सुव्यवस्था ढासळली?; वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांविरोधात संताप

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!