• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अखेर स्थगिती उठली; ओमराजेंच्या कामाचा धडाका सुरू, पत्रकबाजांवर सोमनाथ गुरव यांचा हल्लाबोल

admin by admin
June 23, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव | धाराशिव शहरातील विविध विकासकामांवरील स्थगिती अखेर उठल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत पत्रकबाजी करून अपयश झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

गुरव म्हणाले की, धाराशिव शहरातील ज्या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे, ती कामे यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मंजूर केली होती. आता त्याच कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी शिंदे यांनी स्थगिती उठवली आहे. त्यामुळे श्रेय घेण्यापेक्षा शहरासाठी आतापर्यंत कोणती विकासकामे केली याची यादी संबंधितांनी जनतेसमोर मांडावी, असा टोला त्यांनी लगावला.

राणा पाटील यांच्याकडे सत्ता येऊन जवळपास सहा महिने झाले असून यापूर्वीही ते सत्तेत होते. मात्र त्यांनी धाराशिव शहरासाठी कोणती ठोस विकासकामे केली, याचा हिशोब द्यावा, अशी मागणी गुरव यांनी केली. “आम्ही अवघ्या तीन दिवसांत शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी निधी आणला, तर त्याआधीच आमच्यावर टीका करणारी पत्रके प्रसिद्ध झाली. हे हास्यास्पद असून यावरूनच त्यांचे कर्तृत्व दिसून येते,” असेही ते म्हणाले.

“नुसत्या घोषणा आणि गप्पांमधून विकास होत नाही. त्यासाठी विकासाचे व्हिजन आणि काम करण्याची प्रामाणिकता आवश्यक असते. गेल्या ४० वर्षांत जिल्ह्याच्या विकासाचे जे चित्र दिसले, ते सर्वांनी पाहिले आहे. एवढ्या मोठ्या शहरात एक दर्जेदार उद्यानही उभे राहू शकले नाही, हे शहराचे दुर्दैव आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करत गुरव म्हणाले, “हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे. आगामी काळात ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून आणखी विकासकामे केली जातील आणि विकास म्हणजे काय हे जिल्ह्याला दाखवून दिले जाईल.”

पत्रकबाजीमुळे केवळ माध्यमांमध्ये चर्चा होते, मात्र आम्ही जनतेच्या हिताची कामे प्रत्यक्षात आणि दृश्यमान स्वरूपात करून दाखवू, असा विश्वासही सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केला.

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

 

Previous Post

कालच शिंदेसेनेत एन्ट्री, आज धाराशिवसाठी १८ कोटींची लॉटरी!

Next Post

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

ताज्या बातम्या

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर ‘टक्केवारी’चा आरोप

August 23, 2026

Recent Posts

  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
  • दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर ‘टक्केवारी’चा आरोप
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!