तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावातील गट क्रमांक १७६ च्या जमिनीच्या एनए लेआउट घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धाराशिव आणि तुळजापूर तहसीलदारांनी एकाच सर्वे नंबरचा एनए लेआउट मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ७३ प्लॉट्सची खरेदी ९ डिसेंबर २०२४ रोजी झाली होती. यानंतर तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीनुसार विक्रेता पवनजित कौर गिरवरसिंग सुखमणी (वय ५४, रा. औरंगाबाद) आणि खरेदीदार सतिश सोपानराव पैरणाळे (वय ५८, रा. पुणे) यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले तिघे अद्यापही मोकाट आहेत. त्यांच्याच या सर्व भानगडीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजते.