धाराशिव तहसील कार्यालय सध्या एका अनोख्या ‘गोलमाल’ मालिकेमुळे चर्चेत आहे. मॅडमच्या नेतृत्वाखाली इथं गैरव्यवहारांची अशी यादी आहे की, त्यावर सीरियल बनवता येईल! यामध्ये नियमांचा चुराडा, ग्रीन झोनमध्ये ‘हरित’ पैसा, आणि विनापरवाना उत्खननाचा ‘खणखणीत’ आवाज आहे.
ले-आऊटचा ‘आऊट-ऑफ-द-बॉक्स’ खेळ
मॅडमने ले-आऊट मंजुरीच्या नावाखाली असा उद्योग मांडला आहे की, नियमांचे पालन करण्याचा साधा विचारही कुणाच्या मनात आला नाही. ग्रीन झोनमध्ये सगळे ‘ग्रीन’च झाले; ओपन स्पेसचा चहा प्यायल्यासारखा चक्क फटका मारला गेला. १० टक्के अॅमिनीटी स्पेस सोडणं तर त्यांच्या ‘ब्लूप्रिंट’मध्येच नव्हतं.
खनिजाचा ‘मुरुम मसाला’
तहसीलदार मॅडमने ५०० ब्रास मुरुमाला परवानगी दिली, पण उरलेल्या ५०० ब्रासचा असा गायब झाला की खनिज विभागही म्हणालं, “हे काय घडतंय?”
कॅशबुकचा ‘हिशोब नाही’
गेल्या सहा महिन्यांपासून कॅशबुकावर स्वाक्षरी नाही. म्हणजे पैसे कुठे जातायत याचा ‘हिशोब’ कोणालाच नाही, फक्त पैसे येतायत हेच मॅडमसाठी महत्त्वाचं.
नांदेड हॉस्पिटलचं कमाल गणित
वाझेची बहीण म्हणून ओळख असलेल्या मॅडमचा नवरा नांदेडला हॉस्पिटल चालवतो, जे ‘चालतं नाही’. पण मॅडमचा ब्लॅक पैसा ‘डॉक्टर’ झाला आणि वाईट वाटणारं हॉस्पिटल चांगलं वाटायला लागलं.मागील सात वर्षात मॅडमनी अनेक शहरात फ्लॅट्स ,प्लॉट घेऊन ठेवली आहे तसेच तीन ते चार आलिशान गाड्या रस्त्यावर फिरताहेत. सोन्याचा तर हिशोब नाही.
लिपिक पार्टनरचा ‘बारुळ’ बार
या सगळ्या चमत्कारात मॅडमला साथ होती एका ‘लिपिक पार्टनर’ची. हा काळे कारनामे लिपिक इतका हुशार आहे की तुळजापुरात ड्युटी असताना धाराशिवमध्ये प्रतिनियुक्ती घेऊन गैरव्यवहारांची ‘बार’ वाढवली. आता त्याने बारुळमध्ये लाखो रुपयाची शेत जमीन घेतली आहे आणि तुळजापुरात आलिशान बंगला बांधलाय. लिपिक असताना तहसीलदारप्रमाणे आलिशान कारमधून ऑफिसला येतोय आणि रुबाब मारत घरी जातो.
शेवटी ‘पकडले जाणार का?’
धाराशिवकरांनी मागणी केली आहे की, एसीबीने या ‘धनसम्राज्ञी मॅडम’ उर्फ वाझेची सिस्टर आणि ‘लिपिक पार्टनर’च्या काळ्या कृत्यांची चौकशी करावी. सध्या तरी तहसील कार्यालयाचं काम ‘गोलमाल’च्या सिक्वलसारखं सुरू आहे.