• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी : इंदापूरमध्ये सशस्त्र चोरट्यांचा धुडगूस

 तीन महिला जखमी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

admin by admin
January 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी  – वाशी तालुक्यातील इंदापूर येथे रविवारी पहाटेच्या सुमारास चार सशस्त्र चोरट्यांनी धुडगूस घालत घरातील तीन महिलांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील व घरात ठेवलेले दागिने आणि रोकड असा अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास चार चोरटे प्रल्हाद कवडे यांच्या घरी आले. त्यांनी दरवाजा वाजवल्यावर संतोषी कवडे दार उघडण्यासाठी गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून अंगावरील दागिने हिसकावून घेतले. यावेळी त्यांच्या आईलाही मारहाण करून अंगावरील दागिने लंपास केले. घरातील गोंधळ ऐकून शेजारच्या रुक्मिणी काशीद बाहेर आल्या असता त्यांनाही चोरट्यांनी मारहाण केली.

दरम्यान, इतर चोरट्यांनी घरातील पत्र्याच्या पेट्यांमधून दोन लाख रुपये रोख हस्तगत केले. या घटनेत चोरट्यांनी २९ ग्रॅम सोने आणि रोख असा एकूण २ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

वाशी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सावंत तपास करत आहेत. श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. श्वानाने चोरी झालेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावरील एका हॉटेलपर्यंत माग काढला. त्यामुळे चोरटे हॉटेलपासून वाहनाने पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Previous Post

बाभळगाव पुलाखाली आढळलेल्या तिन्ही मृतदेहांचा उलगडा

Next Post

बाभळगाव ते जळकोट: यमाच्या रस्त्याची दाहकता !

Next Post
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव पुलाखाली तीन मृतदेह आढळले

बाभळगाव ते जळकोट: यमाच्या रस्त्याची दाहकता !

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास

October 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!