धाराशिव : जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, परंडा आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलुप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
परंडा तालुक्यातील भारत बाबुसिंग ठाकुर (वय 70) यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तींनी दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3 वाजता तोडून आत प्रवेश केला. घरातून 19 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 75,000 रुपये रोख असा एकूण 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 305(अ), 331(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब तालुक्यातील वडगाव येथील रामभाऊ गहिनीनाथ नवले (वय 86) यांच्या घरी दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटातून 151 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 लाख रुपये रोख असा एकूण 5,80,210 रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद येरमाळा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 305(अ), 331(3) नुसार करण्यात आली आहे.