नळदुर्ग – नळदुर्ग-सोलापूर रोडवर कंटेनरच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रतन सुरेश गायकवाड (वय ३५, रा. खानापूर) हे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास नळदुर्गहून सोलापूरच्या दिशेने जात होते. केरूर शिवारातील त्रिंबक गवारे यांच्या शेताजवळ एनएच ६५ रोडवर कंटेनर क्रमांक एमएल ०१ एसी ८८०० ने त्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली.
या अपघातात रतन गायकवाड गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. कंटेनर चालक सोहेब लतीफ अख्तर (रा. सराय अनदेव पुरेलाल, जि. प्रतापगढ, राज्य उत्तरप्रदेश) याच्या निष्काळजी आणि हलगर्जीमुळे अपघात झाल्याचा आरोप आहे.
या घटनेची माहिती बालाजी महादेव पवार (वय ३५, रा. मुरस्ती ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
भरधाव कारने दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू
नळदुर्ग – सलगरा मडी ते अचलेर रस्त्यावर कार आणि दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नरसिंह उर्फ नरसिंग कल्याणी मडीवाळ (वय ४१, रा. सिंदगाव ता. तुळजापूर) हे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.४५ वाजता त्यांच्या मोटरसायकल (एमएच २५ एवाय ९५१३) वरून प्रवास करत होते.
दरम्यान, एमएच १३ एझेड १४६३ क्रमांकाच्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून मडीवाळ यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात नरसिंह मडीवाळ गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर कार चालक जखमींना मदत न करता, वाहन घेऊन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कल्याणी गुरप्पा मडीवाळ (वय ७५, रा. सिंदगाव ता. तुळजापूर) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नळदुर्ग-सोलापूर रोडवर अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहनचालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
उमरग्यात टेम्पोतून पडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
उमरगा – उमरगा येथे टेम्पोतून पडून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋतिक रमेश पात्रे (वय १७, रा. मुन्सी प्लॉट, एकोंडी रोड, उमरगा) हा ८ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजता आयशर टेम्पोतून (एमएच १३ एक्स ४३२४) प्रवास करत होता. टेम्पो चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने आणि अचानक ब्रेक मारल्याने ऋतिक टेम्पोतून खाली पडून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती ऋतिकची आई, प्रतिभा रमेश पात्रे (वय ४०) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चालकावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम २८१, 125(अ), 125(ब), 106(1) आणि मोटर वाहन कायदा (MVA) कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.