• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, February 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती

निलंबित पोलीस निरीक्षकाच्या खांद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी

admin by admin
November 10, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती
0
SHARES
2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त झालेल्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि मनोज निलंगेकर यांची उमरगा येथे बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी निलंबित झालेल्या पोलीस निरीक्षकाच्या खांद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद दररोज सोन्याचे अंडे देणारे पद असल्याने या क्रीम पोस्टींगवर अनेकांचा डोळा होता. या शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार होते, पण मागील एक महिन्यापासुन या पदावर वर्णी लागावी म्हणून चार पोलीस निरीक्षकांनी आपापल्या ‘गॉडफादर’ मार्फत जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यात आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर सर्वात आघाडीवर होते. मी तात्पुरता आनंदनगरला आहे , स्थानिक गुन्हे शाखेला जाणार आहे, हे मागील तीन महिन्यापासुन ते सांगत होते. त्यासाठी त्यांनी बीडच्या डीएम मार्फत वशिला लावला होता, पण त्यांचे हे स्वप्न हवेत विरले.

अखेर पालकमंत्र्यांच्या भावामार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदावर वासुदेव मोरे यांची वर्णी लागली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि मनोज निलंगेकर यांची उमरगा येथे बदली करण्यात आली आहे. तसेच सपोनि संतोष तिगोटे यांची पोलीस नियंत्रण कक्षातून ढोकी येथे, सपोनि सुदर्शन कासार यांची उमरगा येथून स्थानिक गुन्हे शाखा येथे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांची पोलीस नियंत्रण कक्षातून ढोकी येथे, पोलीस उपनिरीक्षक जी.व्ही.गोडसे यांची कळंब येथून जीविशा , धाराशिव येथे बदली करण्यात आली आहे. या बदलीचा आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काढला आहे.

वादग्रस्त कारकीर्द

  • पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांची बीडमधील कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. मे २०२० मध्ये बीड शहर पोलीस स्टेशनला असताना, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी लॉकडाऊनमधील संचारबंदी शिथिलतेच्या काळात व्यापाऱ्यांना मारहाण केली होती.त्याची तक्रार आ. विनायक मेटे यांनी केली होती. त्यामुळे त्यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली होती,
  • १८ ऑगस्ट २०२२ रोजी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पोलिसांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे गुटखा, मटका, जुगार, तसेच मद्यविक्री यांचे अवैध धंदे चालू असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले होते. त्यानंतर ते पुन्हा पोलीस खात्यात जॉईन होताच, बीडहुन धाराशिवला बदली झाली असता, त्यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

निलंबित पोलीस निरीक्षकाच्या खांद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी

अवैध मद्यविक्रीला पाठीशी घातल्याच्या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना शासनाने मागील वर्षी निलंबित केले होते. . १८ ऑगस्ट २०२२ रोजी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पोलिसांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे गुटखा, मटका, जुगार, तसेच मद्यविक्री यांचे अवैध धंदे चालू असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वासुदेव मोरे यांच्या निलंबनासह कारवाई करण्यात अकार्यक्षम ठरल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक सुनील जायबाय यांचे अकार्यकारी पदावर स्थानांतर करण्याची घोषणाही तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी केली होती. या निलंबित पोलीस निरीक्षकाला धाराशिवला स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तसेच गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाची महत्वाची भूमिका असते, पण वादग्रस्त पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने केवळ ‘वसुली’ करण्यासाठी नेमण्यात आले का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

 

 

Previous Post

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांचा गडकरी, फडणवीस यांच्याकडून आढावा

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील १७ मंडळांनी घोडे मारले का ?

Next Post
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती

धाराशिव जिल्ह्यातील १७ मंडळांनी घोडे मारले का ?

ताज्या बातम्या

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

February 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भूममध्ये अवैध सावकारीचा हैदोस; ३० हजारांच्या बदल्यात ६० हजार उकळले, तरीही साडेतीन लाखांची मागणी

February 11, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापुरात किरकोळ वादातून महिलेची गळा आवळून हत्या; आरोपीवर गुन्हा दाखल

February 11, 2026
रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

February 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group