• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, February 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील १७ मंडळांनी घोडे मारले का ?

दिवाळीपूर्वी अग्रीम न मिळाल्याने शेतकऱ्यांत संताप

admin by admin
November 4, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे, त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले असून, रब्बीची आशा मावळली आहे. तरीही आठ पैकी धाराशिव , लोहारा आणि वाशी हे तीनच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत , तसेच खरीप अग्रीम विमा ५७ पैकी ४० मंडळांना मिळणार असून, १७ मंडळे वगळण्यात आली आहेत. विमा प्रकरणी भेदभाव करण्यात आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

‘दुष्काळ’ हा धाराशिव जिल्ह्याच्या पाचवीला पुजला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. पिण्याची पाण्याची टंचाई आतापासून जाणवू लागली आहे. जिल्ह्यात मोठा 1, मध्यम 17, लघु 208, असे एकूण 226 प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील 226 प्रकल्पांची 726.962 दलघमी पाणी साठविण्याची क्षमता आहे. मात्र, जुलैअखेरीस एकूण प्रकल्पात फक्त 53.2468 दलघमी पाणी असून, त्याची टक्केवारी 7.32 इतकी आहे. जिल्ह्यातील 34 प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना, धाराशिव , लोहारा आणि वाशी हे तीनच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा, कळंब तालुक्यावर अन्याय करण्यात आला आहे , त्याचबरोबर जिल्ह्यातील ५७ पैकी ४० मंडळांना खरीप पीक विमा चा अग्रीम वाटप करण्यात आला तर तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, मोहा, गोविंदपूर, भूम तालुक्यातील भूम,वालवड, अंभी, पाथरुड, माणकेश्वर, आष्टा, परांडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या १७ मंडळावर अन्याय करण्यात आला आहे. या  मंडळांनी घोडे मारले का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

तुळजापूर तालुक्यात एकूण ९ मंडळे आहेत. त्यातील फक्त नळदुर्ग वगळता अन्य आठ मंडळांना अग्रीम देण्यात आला आहे , त्यामुळे नळदुर्ग मंडळातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. जिल्ह्यातील वगळलेल्या १७ मंडळांना अग्रीम न दिल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता आहे.

 

Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती

Next Post

मराठा आंदोलनात अखेर देवेंद्र फडणवीसच ठरले ‘संकटमोचक’

Next Post
मराठा आंदोलनात अखेर देवेंद्र फडणवीसच ठरले ‘संकटमोचक’

मराठा आंदोलनात अखेर देवेंद्र फडणवीसच ठरले 'संकटमोचक'

ताज्या बातम्या

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

February 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भूममध्ये अवैध सावकारीचा हैदोस; ३० हजारांच्या बदल्यात ६० हजार उकळले, तरीही साडेतीन लाखांची मागणी

February 11, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापुरात किरकोळ वादातून महिलेची गळा आवळून हत्या; आरोपीवर गुन्हा दाखल

February 11, 2026
रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

February 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group