• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाखरवाडी आणि दुधगावातील बोअरवेल पुनर्भरणाचा अभिनव उपक्रम

उर्ध्वम, बायर आणि ज्ञानप्रबोधिनी यांच्या संयुक्त प्रयत्नाने पाणीटंचाईला दिलासा

admin by admin
March 8, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
वाखरवाडी आणि दुधगावातील बोअरवेल पुनर्भरणाचा अभिनव उपक्रम
0
SHARES
501
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाखरवाडी – धाराशिव जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाई जाणवते. भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खालावत असून, अनेक भागांत बोअरवेल कोरड्या पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे येथील उर्ध्वम संस्था आणि ज्ञानप्रबोधिनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व बायर कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून वाखरवाडी आणि दुधगाव येथे बोअरवेल पुनर्भरणाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमांतर्गत बोरचार्जर या अत्याधुनिक पेटंटेड तंत्रज्ञानाच्या मदतीने बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे बोरवेलमधील पाणीपुरवठ्याचा कालावधी १ ते ३ महिन्यांनी वाढतो आणि भूजल पुनर्भरण ४ ते २० पट वाढते. परिणामी, २ लाख ते ८० लाख लिटर पाणी एका बोअरवेलमध्ये पुन्हा साठवले जाऊ शकते.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

या तंत्रज्ञानाविषयी जागृती करण्यासाठी वाखरवाडी आणि दुधगाव येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे समन्वयक सचिन सूर्यावंशी यांनी उपस्थितांना या प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली.
उर्ध्वम संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रफुल पाटील यांनी बोअर चार्जर तंत्रज्ञान कसे कार्य करते, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
तर भूवैज्ञानिक घनश्याम बागले यांनी भूजल पुनर्भरणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या धाराशिव तालुक्यात २५० बोअरवेलचे पुनर्भरण पूर्ण झाले आहे. दुधगावमध्ये ४२ आणि वाखरवाडीमध्ये १० बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले आहेत.

ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद

कार्यक्रमाच्या शेवटी जलयोद्धे लहू शिंदे यांनी आभार मानले. दुधगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच मिरज पटेल, तसेच ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे जलदूत लहू शिंदे, महेश धाबेकर, अमर शेख, सुशांत पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला. ग्रामपंचायतीकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन देण्यात आले असून, नागरिकांनी आपल्या बोअरवेल पुनर्भरणासाठी पुढे यावे, असे आवाहन सरपंचांनी केले.

बोअरवेल पुनर्भरणामुळे पाणीटंचाईला दिलासा

उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, या प्रकल्पाच्या माध्यमातून भूगर्भातील जलसाठा वाढवण्यास मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरल्यास भविष्यात पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा मिळू शकतो.

Previous Post

नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्यावर दलालांची कोल्हेकुई – गोळ्या घाला, पण काम होऊ देणार नाही!

Next Post

तुळजाई हॉटेलजवळ तरुणाला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजाई हॉटेलजवळ तरुणाला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group