नळदुर्ग – अक्कलकोट हा ३२ किलोमीटर रस्ता … पैकी २१ किलोमीटर रस्ता सोलापूर आणि ११ किलोमीटर रस्ता धाराशिव हद्दीत येतो. सोलापूर हद्दीतील २१ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले होते, पण धाराशिव हद्दीतील ११ किलोमीटर रस्त्याचे काम काही दलालांनी अडवले होते. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर हे काम सुरु झाले. ते आता पूर्ण होत असताना दलालाच्या पोटात मळमळ होत आहे. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा नौटंकी सुरू केली आहे.
🚧 सुरुवातीला नळदुर्ग-अक्कलकोट हा रस्ता चार पदरी राष्ट्रीय महामार्ग होणार होता – दलालांनीच तो रद्द करून घेतला!
🚧 सरकारने तडजोड म्हणून १२ मीटर डांबरीकरणाचा निर्णय घेतला, तरीही पुन्हा दलाल आडवे!
🚧 ‘आम्हाला गोळ्या घाला, पण आम्ही रस्ता होऊ देणार नाही!’ – असा नवा गदारोळ सुरू!
“पोलीस आणि महसूल प्रशासन गप्प का?”
📢 रस्त्यावर कोल्हेकुई करणाऱ्या दलालांवर अजून गुन्हे का दाखल झाले नाहीत?
📢 प्रशासन काय पाहतंय? कायदा आणि सुव्यवस्था यांचा बोजवारा उडवणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई का होत नाही?
📢 शासन, पोलीस, महसूल यंत्रणा गप्प बसून काय संदेश देत आहे?
“जनता त्रस्त, रस्ता लोंबकळला – पण दलालांचा धंदा तेजीत!”
✅ भाविक, व्यापारी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसतोय!
✅ अपघात वाढले, रुग्णवाहिका रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत – पण तरीही हेच ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ पुन्हा आडवे!
✅ शेतकऱ्यांचे नाव पुढे करून फक्त स्वतःचा खिसा भरणारे हे दलाल आता लोकांसमोर उघडे पडले!
“आता लोकांचा संयम सुटतोय – प्रशासनाने वेळीच पावलं उचलावीत!”
📢 रस्ता रोखणाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करा!
📢 दलालांना तडीपार करा – जनतेचा संयम संपत चाललाय!
📢 रस्त्याच्या विकासावर गदा आणणाऱ्या ‘ब्लॅकमेलिंग डी. जे. ’ ला चोख उत्तर द्या!
👉 “रस्ता हा लोकांचा आहे – तो दलालांचा धंदा नाही!”
👉 “पोलीस आणि महसूल प्रशासन गप्प का? – आता कारवाई झालीच पाहिजे!”
👉 “रस्ता बंद, लोकांचे हाल – आणि हे गुंड अजूनही मोकाट? – आता बस झालं!”
🚀 “नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्यावर आता प्रवासी सुसाट धावले पाहिजेत – आणि दलालांना धूळ चारली पाहिजे!” 🚀