भुम: तालुक्यातील वाल्हा येथे किरकोळ कारणावरून एका युवकासह त्याच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 14 मार्च 2025 रोजी रात्री 8 वाजता वाल्हा गावात दत्ता आप्पासाहेब शेळवने (वय 23, रा. वाल्हा) यांच्यासोबत वाद झाला. फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी “तु माझ्याकडे बघून का हासलास?” या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी त्यांच्या आई-वडिलांनाही मारहाण करून जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात रत्नदीप शिवाजी चव्हाण, पवन शिवाजी चव्हाण, भाउसाहेब वसंत चव्हाण, अतुल लक्ष्मण चव्हाण, प्रसाद मोतीराम चव्हाण (सर्व रा. वाल्हा, ता. भुम, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता शेळवने यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भुम पोलीस करीत आहेत.