अणदूर – आरोपी नामे- 1)अक्षय राजु चव्हाण, 2) राजु देवराव चव्हाण, 3)चिकु पिंटु चव्हाण, 4) राहुल अनिल चव्हाण, 5) पिंटु देवराव चव्हाण, 6) पंकज शिवाजी चव्हाण, 7) जयाबाई पिंटु चव्हाण सर्व रा. वत्सलानगर, अणदुर ता. तुळजापूर यांनी दि.03.11.2023 रोजी 19.00 वा. सु. वत्सलानगर, अणदुर येथील चिवरी उमरगा जाणारे रोडचे पुलावर फिर्यादी नामे- अशोक प्रभाकर राठोड, वय 33 वर्षे, ( रा. वत्सलानगर अणदुर ) यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुनलाथाबुक्यांनी, काठीने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अशोक राठोड यांनी दि.04.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : आरोपी नामे- 1)स्वाती व्यंकट कांबळे, 2)व्यंकट माणिक कांबळे, 3) ज्ञानेश्वर महादेव कांबळे, तिघे रा. उदतपूर, ता. लोहारा जि. धाराशिव, यांनी दि.04.11.2023 रोजी 13.00 वा. सु. उदतपुर शिवारातील शेत गट नं 44/1 मध्ये फिर्यादी नामे- अरविंद शेषेराव वाघमारे, वय 33 वर्षे, रा. उदतपुर ता. लोहारा, जि. धाराशिव यांना शेतातील सोयाबीन काढणेचे कारणावरुन नुमूद आरोपींनी ते शेत माझे आहे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अरविंद वाघमारे यांनी दि.04.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.