• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा; ५१ हजारांचा साठा जप्त

admin by admin
March 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा; ५१ हजारांचा साठा जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव शहरातील शम्स चौक येथे छापा टाकून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ५१,१८५ रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत करण्यातआले असून, आरोपी सलमान गुलाम शेख (वय २५, रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक  संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या पथकाने तपास मोहीम राबवली.

गुप्त माहितीवरून छापा

धाराशिव शहरात गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शम्स चौकातील एका गाळ्यात आरोपी सलमान शेख महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून विक्री करत आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या समक्ष छापा टाकला.

५१ हजारांचा गुटखा जप्त

छाप्यात सितार गुटखा, बादशाहा गुटखा, आरसीबी, आरएमडी पान मसाला, माणिकचंद गुटखा, एम गोल्ड तंबाखू, जाफरानी जर्दा, रोयल ७१७ आणि एक्स्ट्रा तंबाखू यासह रत्ना छाप तंबाखूच्या १८१ डब्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत ५१,१८५ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपी सलमान शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा गु.र.नं. ११५/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम २२३, २७५, १२३ तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

 

Previous Post

महावितरणमध्ये कोट्यवधींचा घोटाळा?

Next Post

भूम तालुक्यात दोन गटांत हाणामारी; दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

भूम तालुक्यात दोन गटांत हाणामारी; दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!