परंडा : आरोपी नामे- निलेश बिभीषण चव्हाण, व सोबत मयत नामे-राघु प्रल्हाद चव्हाण, वय 60 वर्षे, रा. कुंभेजा ता. परंडा जि. धाराशिव हे देाघे दि.18.05.2024 रोजी 04.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 5098 वर जात होते. दरम्यान आरोपी नामे- निलेश चव्हाण यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजी पणे अतिवेगाने चालवून मोटरसायकल घसरुन पडल्याने राघु चव्हाण हे मोटरसायकलवरुन खाली पडून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद राघु चव्हाण, वय 37 वर्षे, रा. कुंभेजा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.10.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह कलम 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर: फिर्यादी नामे-अर्जुन शहाजी दंडनाईक, वय 18 वर्षे, रा. पळसवाडी ता. जि. धाराशिव ह.मु. राज पॅलेस तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव व सोबत त्यांचा मित्र जखमी नामे- अनुज रविंद्र कोरडे, वय 26 वर्षे, रा. हाडको तुळजापूर हे दोघे दि. 02.06.2024 रोजी 02.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच एझेड 5958 वरुन तुळजापूर कडे येत होते. दरम्यान आरोपी मयत नामे–प्रदिप देविदास तिघाडे, वय 28 वर्षे, रा. आशिव ता. औसा जि. लातुर यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 एएम 5243 ही हायगयी व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून अनुज कोरडे यांचे मोटरसायकल समोरुन धडक दिली. या अपघातात प्रदिप तिघाडे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. तर अनुज कोरडे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अर्जुन दंडनाईक यांनी दि.10.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.