• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकरीविरोधी केंद्रीय परिपत्रकावर आक्षेप

राज्य तक्रार समितीची होणार 25 जूनला बैठक-आ.कैलास पाटील

admin by admin
June 10, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
शेतकरीविरोधी केंद्रीय परिपत्रकावर आक्षेप
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याविरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल करत,कृषी विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए.कुंदन यांची भेट विमा अभ्यासक अनिल जगताप व आमदार कैलास पाटील यांनी घेतली. यावेळी श्रीमती कुंदन यांनी 25 जून रोजी समितीची बैठक आयोजित केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

पिक विमा अभ्यासक अनिल जगताप व आमदार कैलास पाटील यांनी (ता. दहा )रोजी केंद्र शासनाने काढलेल्या 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकाविरुद्ध प्रशासनाला जाब विचारला. राज्यातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली. या परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील 75 टक्के शेतकऱ्याचे नुकसान होत असून सरसकट नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहत आहे.चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील पाच लाख साठ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला.त्यापूर्वी कंपनीला 639 कोटी रुपये रक्कम देणे होते.सुरुवातीला 21 दिवस पावसाचा खंड पकडून जिल्हाधिकारी यांनी एक अधिसूचना काढली. त्यात जिल्ह्यातील 57 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 254 कोटी रुपये अग्रीम रक्कम देण्यात आली. नंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्याने एक लाख 92 हजार शेतकऱ्यांनी वैयक्तिक पूर्व कल्पना देत नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली.

मात्र केंद्र शासनाने 30 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढून एखाद्या महसूल मंडळातील विमा भरलेल्या क्षेत्रापैकी 25 टक्के क्षेत्रापेक्षा जास्त पूर्व सूचना आल्या तर वैयक्तिक नुकसानीपासून ते मंडळ वंचित ठेवण्याचा अजब फतवा काढला आहे.या परिपत्रकानुसार धाराशिव जिल्ह्यात फक्त 37हजार 574 शेतकऱ्यांना 39 कोटी 52 लाख रुपये वितरण केले आहे. या नवीन नियमाचा फटका बसून जिल्ह्यातील 32 महसूल मंडळाला एकही रुपया मिळालेला नाही यामुळे नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहिला आहे. नवीन परिपत्रका नुसार सरसकट शेतकऱ्यांना केवळ प्रति हेक्टर साडेतीन हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. यापूर्वी पाच हजार रुपये अग्रीम दिल्याने दीड हजार रुपये विमा कंपनीला परत देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

शेतकऱ्यावर होत असलेला हा अन्याय लक्षात घेऊन अनिल जगताप व आमदार कैलास पाटील यांनी आज थेट राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली. पिक विमाबाबत 26 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल करता येते.त्याप्रमाणे ही याचिका दाखल केली आहे. कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय.ए. कुंदन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी याविषयी 25 जून रोजी सुनावणी घेणार असल्याचे सांगितले.30 जून 2024 चे परिपत्रक रद्द करावे व 26 जून 2023 च्या परिपत्रकानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रमुख मागणी आमदार पाटील व अनिल जगताप यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने अचानक पणे काढलेल्या 30 एप्रिलच्या परिपत्रकाविरुद्ध राज्य समितीकडे याचिका दाखल केली आहे.जून 2023 च्या परिपत्रकानुसारच विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांच्यासह मी केली आहे. 25 जून रोजी सुनावणी होऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
– अनिल जगताप – विमा अभ्यासक

 

Previous Post

वाशीमध्ये दोन अपघातात एक ठार , दोन जखमी

Next Post

परंडा आणि तुळजापूर येथे अपघात, दोन ठार, दोन जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

परंडा आणि तुळजापूर येथे अपघात, दोन ठार, दोन जखमी

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!