वाशी : मयत नामे- माधव ज्ञानदेव करळे, वय 51 वर्षे, रा. चिंचपुर, ढगे, ता. भुम जि. धाराशिव हे छत्रपती संभाजीनगर येथुन मोटरसायकल क्र एमएच 25 व्ही 3772 वरुन दि. 03.06.2024 रोजी 18.30 वा. सु. एनएच 52 रोडवरुन जात होते. दरम्यान यशवंडी पाटीजवळ स्विफट डिझायर कार क्र एमएच 45 एन 6025 चा चालकाने त्याचे ताब्यातील स्विफट डिझायर कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून माधव करळे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात माधव करळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच स्विफट डिझायर कार चा चालक हा जखमीस उपचार कामी न नेता व अपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- केशव ज्ञानोबा उर्फ ज्ञानदेव करळे, वय 46 वर्षे, रा. चिंचपुर ढगे ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.09.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 ( अ) सह कलम 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : जखमी नामे-अंकुश लक्ष्मण तातुडे, व अमर मोहन सुबुगडे रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव हे दोघे दि. 14.05.224 रोजी 07.45 वा. सु. पारगाव रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेड 8971 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 ए.वाय 6631 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अंकुश तातुडे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात अंकुश तातुडे, अमर सुबुगडे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शुभम अंकुश तातुडे, वय 27 वर्षे, रा. पारगाव, ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.08.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह कलम 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
नळदुर्ग : आरोपी नामे-अनिल लक्ष्मण हिप्परगे रा. फुलवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 01.08.2022 ते दि. 20.04.2023 रोजी पावेतो फुलवाडी तुळजापूर येथे फिर्यादी नामे- तानाजी सुभाष हांडगे, वय 36 वर्षे, फुलवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीचे गावाशेजारील एक एक्कर ची प्लॉटींग मध्ये दोन प्लॉट नावावर करुन देतो असे म्हणुन तानाजी शिंदे यांना विश्वासात धेवून रोख रक्कम 4,00,000₹ घेवून आज पावेतो प्लॉटींग नावावर न करुन देता शिंदे यांचे पैसे परत न करता विश्वासघात करुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तानाजी शिंदे दि. 08.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.