वाशी : आरोपी नामे- राजाभाउ धर्मा पुलावळे, बाळू धर्मा पुलावळे, संतोष धर्मा पुलावळे, सविता संतोष पुलावळे, रुक्मीनी धर्मा पुलावळे, सर्व रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 05.06.2024 रोजी 08.30 वा. सु. ईट येथे फिर्यादी नामे- जनार्धन श्रीपती थोरात, वय 54 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांना व शिवाजी एकनाथ थोरात यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने, काठी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जनार्धन थोरात यांनी दि. 09.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : आरोपी नामे-रामलिंग निवृत्ती जगताप, वय 55 वर्षे, विनोद बाबासाहेब जगताप, वय 53 वर्षे, दिनकर दत्तात्रय जगताप, वय 68 वर्षे, अभिषेक दत्तात्रय जगताप वय 40 वर्षे, ओंकार दत्तात्रय जगताप, वय 53 वर्षे, सर्व रा.कडकनाथवाडी, ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.25.03.2024 रोजी 11.00 वा. सु.कडकनाथवाडी शिवार येथील शेत गट नं 338/अ/6 येथे फिर्यादी नामे- नारायण लक्ष्मण जगताप, वय 65 वर्षे, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी अनिता व मुलगा प्रमोद यांना नमुद आरोपींनी जमीनीच्या वादाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. मा. कोर्ट कळंब येथुन एम केस प्राप्त झाल्याने दि. 09.06.2024 रोजी येरमाळा पो. ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 325, 324, 323, 441, 447, 504, 506, (2), 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : आरोपी नामे- महेश गंगाधर खराडे, गणेश गंगाधर खराडे, गंगाधर सदाशिव खराडे सर्व रा.आथर्डी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.07.06.2024 रोजी 20.15 वा. सु. आथर्डी बसस्थानकासमोर फिर्यादी नामे- मन्मथ रावसाहेब झटाळ वय 35 वर्षे, रा. आथर्डी, ता. कळंब जि. धाराशिव यांना मागील भांडनाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, खोऱ्याचा दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मन्मथ झटाळ यांनी दि. 08.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 323, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : आरोपी नामे-हरिदास महादेव डोलारे, वय 26 वर्षे, रेश्मा भिसे, वय 33 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 24.05.2024 रोजी 17.00 वा. सु. सावरगाव येथे फिर्यादी नामे- सहदेव जगन्नाथ साबळे, वय 48 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची भावजई सविता रामचंद्र साबळे यांना नमुद आरोपींनी तुम्हीच आमच्यात भांडण लावता या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करु लागल्याने फिर्यादी हे भाडंण सोडवण्यास गेले असता हरिदास डोलारे यांनी सहदेव साबळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन पाठीमागून धरुन उचलून आपटल्याने फिर्यादी यांच्या मांडीस गंभीर दुखापत होवून फॅक्चर झाली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सहदेव साबळे यांनी दि. 09.06.2024 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 325, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.