नळदुर्ग – नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाला अणदुर शिवारात नॅशनल हॉटेलसमोर एक संशयास्पद आयशर टेम्पो दिसला. पोलिसांनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये एक म्हैस आणि तिची वासरे अत्यंत क्रूर आणि दाटीवाटीने भरलेली आढळून आली. जनावरांना दोरीने बांधून त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून वाहतूक केली जात होती.
पोलिसांनी टेम्पो चालक इस्माईल मुक्तार कुरेशी (वय 29, रा. लष्कर वस्ती, सोलापूर) आणि त्याचा साथीदार जाफर हरुण कुरेशी (वय 29, रा. शास्त्री नगर, सोलापूर) यांना अटक केली. त्यांच्यावर प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1)(ए) (डी))(एच) आणि प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5, 5(अ), 5(ब), 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त केलेल्या टेम्पोची किंमत 8.53 लाख रुपये आहे.
लोहारा – लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाला लोहारेकर हॉटेलसमोर एक पिकअप वाहन संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चार गायी, चार वासरे आणि एक बैल अत्यंत क्रूरपणे कोंबून भरलेले आढळून आले. जनावरांना दोरीने बांधून त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून वाहतूक केली जात होती.
पोलिसांनी पिकअप चालक हारुण फिरोजमियां बेपारी (वय 23, रा. मैदर्गी, सोलापूर) आणि त्याचा साथीदार जयराम शेखर जाधव (वय 55, रा. जेवळी पुर्व तांडा, धाराशिव) यांना अटक केली. त्यांच्यावर प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1)(ड), 11(1)(इ), 11(1) (एच), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 आणि संबंधित कलम 3 (5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. जप्त केलेल्या पिकअपची किंमत 6.38 लाख रुपये आहे.
पोलिसांचे आवाहन
पोलीस अधिकाऱ्यांनी जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.