• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पीकविमा योजनेत जुनी ‘ट्रिगर’ प्रणाली पुन्हा लागू करा!

आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

admin by admin
May 31, 2026
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: चालू हंगामात ‘अल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण होणारी दुष्काळजन्य परिस्थिती, कमी पाऊस आणि अवकाळी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी पूर्वीची ‘ट्रिगर’ व्यवस्था अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे पीकविमा योजनेत ही जुनी ट्रिगर प्रणाली पुन्हा एकदा लागू करावी, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात मराठवाडा आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील शेतीच्या विदारक परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे.

अतिवृष्टी आणि पावसाचा खंड; शेतकरी संकटात

निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यातील पर्जन्यमान अत्यंत अनियमित आणि अनिश्चित आहे. धाराशिव जिल्ह्याचा मागील १५ वर्षांचा अनुभव पाहता, पेरणीच्या काळात अनेकदा पावसाचा मोठा खंड पडतो किंवा काही भागांत अतिवृष्टी होते. यामुळे वेळेवर पेरणी होत नाही किंवा पेरणी झाल्यावर बियाण्यांची उगवण होत नाही. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा मोठा आर्थिक भार पडतो.

सोयाबीनसारख्या मुख्य पिकाला फुलोरा येण्याच्या आणि दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होते. याउलट, याच काळात अतिवृष्टी झाल्यास रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढून पिके हातातून जातात. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाया जातो.

‘मान्सून कोअर झोन’मध्ये कमी पावसाचा अंदाज

हवामान विभागाने यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे देशात व राज्यात कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हा ‘मान्सून कोअर झोन’मध्ये येतो. हाच झोन देशातील कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा आहे. येथे पाऊस कमी झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होईल, अशी भीती आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

…तर शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील!

“पूर्वी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पेरणी अयशस्वी होणे (Prevented Sowing), मध्य हंगामातील प्रतिकूल हवामान (Mid-Season Adversity) आणि काढणीनंतर होणारे नुकसान (Post-Harvest Losses) यासाठी स्पष्ट व प्रभावी ‘ट्रिगर’ निश्चित होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळून त्यांच्या उत्पन्नाला स्थैर्य मिळत होते. मात्र, राज्य शासनाने हे ट्रिगर निकष पुन्हा लागू करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.”

– आमदार कैलास पाटील

चालू हंगामात सरकार जुने ट्रिगर न लावताच पीकविमा योजना राबविण्याच्या तयारीत असून त्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. केवळ ट्रिगर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरूनही त्यांना दुष्काळजन्य परिस्थितीत नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पीकविमा योजनेत पूर्वीप्रमाणे ‘ट्रिगर प्रणाली’ समाविष्ट करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून तात्काळ द्यावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात अवैध दारू अड्यांवर पोलिसांचे छापे; ५० लिटर गावठी मद्यासह दोघींना अटक, करजखेड्यात देशी दारू जप्त

Next Post

कर्तव्यात निष्काळजीपणा; येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

Next Post
कर्तव्यात निष्काळजीपणा; येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

कर्तव्यात निष्काळजीपणा; येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

ताज्या बातम्या

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
  • कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!