• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर: तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी

admin by admin
December 10, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर: तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार आहे. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या वेगात सुरू असून, भाविक आणि पुजारी बांधवांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन नियोजित काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हजारो वर्षांच्या अनमोल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे. लवकरच राज्यासह देशभरातील देविभक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा पाहता येणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण राज्याची सांस्कृतिक राजधानी ठरावे इतके महनीय आहे. हा प्राचीन आणि वैभवशाली वारसा देश आणि जगाच्या पर्यटकांसमोर मांडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी तिर्थक्षेत्राचा संपुर्ण कायापालट करण्यासाठी दोन हजार कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

सध्या सुरू असलेली कामे:

  • मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामे सध्या वेगात सुरू आहेत.
  • टोळभैरव मंदिरातील टाइल्स फरशा काढून पुरातन आकार देण्याचे काम पुरातत्त्व विभागाच्या निगराणीखाली सुरू आहे.
  • दत्तमंदिराच्या कामांना सुरुवात करण्यात आली असून, जुन्या कोरीव दगडांची साफसफाई सुरू आहे.
  • गोमुखतीर्थ आणि परिसरातही जीर्णोद्धाराचे काम वेगात सुरू आहे.

भाविकांसाठी सुविधा:

  • भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
  • ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे.

जिर्णोद्धारात समाविष्ट कामे:

  • मंदिरात नव्याने केलेले बांधकाम काढणे.
  • भुयारी मार्ग, यज्ञमंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदिराचे जतन व दुरूस्ती.
  • गोमुखतीर्थ, दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळतीर्थ, निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, दीपमाळ, शिवाजी महाद्वार व खंडोबा मंदिर, यमाई मंदिराच्या जतन आणि दुरूस्ती.
  • तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशा, आवश्यकतेनुसार दगडी पायर्‍या, महावस्त्र अर्पण केंद्राचे जतन आणि दुरूस्ती.
  • तुकोजीबुवा मठावरील ओव्हर्‍या, आराध्य खोली, दगडी फरशी.
  • तुळजाभवानी देवीचे मुख्य प्रवेशद्वार व जिजामाता महाद्वाराची दुरूस्ती आणि जतन.
Previous Post

डॉ. नितीन ढेपे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत

Next Post

धाराशिवमध्ये एटीएम चोरीची धाडसी घटना

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये एटीएम चोरीची धाडसी घटना

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!