नळदुर्ग : फिर्यादी नामे-संतोष मारुती सारने, वय 42 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना दि. 04.06.2024 रोजी 17.00 ते 05.06.2024 रोजी 17.10 वा. सु.अणदुर येथे असताना आरोपी नामे- रवी कुमार मोबाईल नं 7439298694 वरुन कॉल करुन एस. बी.आय क्रेडीट कार्ड ऑफीसमधून बोलत आहे व तुमचे क्रेडीट कार्ड अपडेट करुन घ्या नाहीतर कार्ड ब्लॅॉक होईल व तुम्हाला 600 ₹ दंड लागेल असे सांगून ओटीपी मागवून घेवून क्रेडीट कार्ड मधून 65,784 ₹काढून घेवून संतोष सारने यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष सारने यांनी दि.04.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 420 सह आय. टी. ॲक्ट, कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ॲटो रिक्षा चालवण्याचे कारणावरुन मारहाण
मुरुम : आरोपी नामे-आकाश बालाजी गोंधळी, बालाजी महादेव गोंधळी, सुमित अभिमन्यु गोंधळी, सर्व रा. कलदेंव निंबाळा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 04.07.2024 रोजी 16.30 वा. सु. कलदेव निंबाळा येथे फिर्यादी नामे- प्रविण गणपती बलसुरे, वय 23 वर्षे, रा. कलदेव निंबाळा ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांचा भाउ नामे- प्रदिप गणपती बलसुरे यांना नमुद आरोपींनी ॲटो रिक्षा चालवण्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तलवार व खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रविण बलसुरे यांनी दि.04.07.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन मुरुम पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 109, 118(1), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.