तुळजापूर | अणदूर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने बाजी मारली आहे. ‘धाराशिव लाइव्ह’ने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, चुरशीच्या लढतीत मशाल पेटली असून कमळ कोमजले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. जितेंद्र कानडे यांनी भाजपच्या ॲड. दीपक आलुरे यांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला आहे.
मावस भावांच्या लढतीत मशाल सरस
दोन मावस भावांमध्ये असलेल्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सुरुवातीला ‘क्रॉस वोटिंग’च्या चर्चांमुळे निकाल धक्कादायक लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा आणि ठाकरे गटाने केलेली बांधणी यामुळे डॉ. जितेंद्र कानडे यांनी विजयाला गवसणी घातली.
रणवीर चव्हाण यांचाही विजय


जिल्हा परिषदेत जरी भाजपला धक्का बसला असला, तरी पंचायत समिती अणदूर गणात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले. त्यांचे नातू रणवीर चव्हाण यांनी या गणातून विजय मिळवत आपल्या राजकीय प्रवासाची यशस्वी सुरुवात केली आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
-
विजयी उमेदवार (Z.P.): डॉ. जितेंद्र कानडे (शिवसेना ठाकरे गट)
-
विजयी उमेदवार (P.S.): रणवीर चव्हाण (काँग्रेस/महाविकास आघाडी)
-
मुख्य फॅक्टर: खासदार ओमराजेंची सभा आणि ‘धाराशिव लाइव्ह’ने वर्तवलेला अचूक अंदाज.
निकालाचे अधिकृत वृत्त समजताच अणदूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.







