• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तेर जिल्हा परिषद गटात अर्चना पाटील यांचा विजय; सक्षणा सलगर तिसऱ्या क्रमांकावर

admin by admin
February 9, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा परिषद: अर्चना पाटील यांची मोठी खेळी; दोन गटांतून उमेदवारी अर्ज दाखल, अध्यक्षपदावर प्रबळ दावेदारी?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या तेर जिल्हा परिषद गटाच्या हायहोल्टेज लढतीत अखेर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी बाजी मारली आहे. अर्चना पाटील यांनी या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व गाजवत विजय संपादन केला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांना मात्र तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

हायहोल्टेज लढत आणि चुरशीचे निकाल

तेर गट हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपच्या अर्चना पाटील यांनी सुरुवातीपासूनच मतदानात आघाडी घेतली होती. त्यांना एकूण ७,५९७ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कीर्तीमाला खटावकर राहिल्या, ज्यांना ५,२३७ मते मिळाली. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सक्षणा सलगर (राष्ट्रवादी – शरद पवार गट) यांना केवळ १,२५३ मते पडल्याने त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत.

अध्यक्षपदासाठी अर्चना पाटील यांची प्रबळ दावेदारी

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी ‘महिला खुला’ (Open Female) प्रवर्गासाठी राखीव आहे. अर्चना पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले असून, आता या मोठ्या विजयानंतर त्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. अर्चना पाटील यांनी विजयानंतर आपल्या समर्थकांचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत.


मतदानाची आकडेवारी थोडक्यात:

  • अर्चना पाटील (भाजप): ७,५९७ (विजयी)

  • कीर्तीमाला खटावकर (शिवसेना ठाकरे गट): ५,२३७

  • सक्षणा सलगर (राष्ट्रवादी शरद पवार गट): १,२५३


Previous Post

धाराशिव लाइव्हचा अंदाज खरा ठरला! अणदूर गटात ‘मशाल’ पेटली; डॉ. जितेंद्र कानडे विजयी

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निकाल: भाजप आणि शिंदे गटाची मुसंडी; कोणाचेही स्पष्ट बहुमत नाही

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निकाल: भाजप आणि शिंदे गटाची मुसंडी; कोणाचेही स्पष्ट बहुमत नाही

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?

परभणीतील ड्रग्ज कारवाईचे धागेदोरे थेट कळंबमध्ये! नगरसेवक मोहसीन मिर्झा अटकेत

August 10, 2026
प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

‘माऊलीं’च्या मनमानीला गुरुजींचा ‘ब्रेक’! ‘प्रमोशन घोटाळ्या’विरुद्ध सर्व संघटना रस्त्यावर!

August 10, 2026
प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

August 10, 2026
ठाकुरांचा नवा ‘बॉम्ब’, झेडपीतला ‘डमी’ डाव अन् नेरुळच्या हॉस्पिटलमधून ‘भावी खासदारा’ची हवा!

ठाकुरांचा नवा ‘बॉम्ब’, झेडपीतला ‘डमी’ डाव अन् नेरुळच्या हॉस्पिटलमधून ‘भावी खासदारा’ची हवा!

August 10, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात देशपांडे स्टँड परिसरात हत्यारांसह फिरणारा ‘चिंट्या जठार’ जेरबंद!

August 10, 2026

Recent Posts

  • परभणीतील ड्रग्ज कारवाईचे धागेदोरे थेट कळंबमध्ये! नगरसेवक मोहसीन मिर्झा अटकेत
  • ‘माऊलीं’च्या मनमानीला गुरुजींचा ‘ब्रेक’! ‘प्रमोशन घोटाळ्या’विरुद्ध सर्व संघटना रस्त्यावर!
  • प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
  • ठाकुरांचा नवा ‘बॉम्ब’, झेडपीतला ‘डमी’ डाव अन् नेरुळच्या हॉस्पिटलमधून ‘भावी खासदारा’ची हवा!
  • धाराशिव शहरात देशपांडे स्टँड परिसरात हत्यारांसह फिरणारा ‘चिंट्या जठार’ जेरबंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!