तामलवाडी: तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांना क्रूरतेने वागवून बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागनाथ ज्ञानदेव मगर (वय ४०, रा. सावरगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.
दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुरतगाव रोडवरील पिंपळा फाट्याजवळ मगर हा एमएच २५ एजे १९०६ क्रमांकाच्या पिकअप गाडीत एक गाय आणि एक वासरू घेऊन जात होता. जनावरांना क्रूरतेने वागवून त्यांची चारापाण्याची व्यवस्था न करता तो कत्तलीसाठी त्यांची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी मगर विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(के), प्राणी संरक्षण कायदा कलम ५(बी) आणि मोवाका कलम ८३, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.