• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, May 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

एपीआय माळाळे यांची वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून गोळ्या झाडून आत्महत्या

आत्महत्येची सीआयडीमार्फत चौकशी करा

admin by admin
October 11, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
एपीआय माळाळे यांची वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून गोळ्या झाडून आत्महत्या
0
SHARES
184
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे धाराशिवचे सुपुत्र आनंद माळाळे यांंनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करून दोषींवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी माळाळे यांच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

धाराशिव शहरातील भीमनगर येथील रहिवाशी असलेले आनंद प्रकाश माळाळे हे मागील 25 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात विविध पदावर सेवेत होते. माळाळे हे आपल्या कुुटुंबीयांसह सोलापूर येथे वास्तव्यास होते. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांची नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बदली झाली होती. मात्र वरिष्ठांकडून त्यांना वेळोवेळी प्रशासकीय मदत मिळाली नाही. त्यांना तपासासाठी अनेक गुन्हे देण्यात आले होते. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोप पाठविणे आवश्यक असणार्‍या अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांना देवून वेळेची मर्यादा घालून देण्यात आली. वरिष्ठांनी माळाळे यांना कुठलीही मदत न करता, गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा व्हावा, दिरंगाई व्हावी, आरोपीला मदत होईल, असे काम केले. वरिष्ठांनी विनाकारण जाणीवपूर्वक व हेतुपूर्वक जातीय द्वेष मनात ठेवून त्यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

माळाळे हे मागील सहा महिन्यांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या या मानसिक त्रासामुळे त्रस्त होते. एक महिन्यापूर्वी माळाळे यांचा अपघात झाल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. या काळात वरिष्ठांनी वेळोवेळी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी माळाळे यांच्यावर दबाव आणला. यातून होणार्‍या त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी पहाटे सोलापूर येथील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

याप्रकरणी आनंद माळाळे यांच्या पत्नी किंवा मुलगा यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून पोलीस अधीक्षक हानपुडे-पाटील, पोलीस निरीक्षक नरूटे, श्री. कासेकर व इतर दोष अधिकारी, कर्मचार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर वंदना माळाळे, रंजना माळाळे, यशवंत माळाळे, मयूर माळाळे, राजाभाऊ ओव्हाळ, विशाल शिंगाडे, रवी माळाळे, पुष्पकांत माळाळे, सिध्दार्थ बनसोडे, संदीप बनसोडे, संग्राम बनसोडे, प्रमोद हावळे, राजाभाऊ बनसोडे, मिलींद बनसोडे, नवज्योत शिंगाडे, विद्यानंद बनसोडे, प्रमोद वाघमारे, विजय बनसोडे, आप्पासाहेब सिरसाटे, गणेश वाघमारे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व इतरांची स्वाक्षरी आहे.

 

Next Post

सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पीक विम्यासाठी नारंगवाडीत रास्ता रोको; १० दिवसांत भरपाई न दिल्यास प्रत्येक तालुक्यात आंदोलनाचा इशारा

पीक विम्यासाठी नारंगवाडीत रास्ता रोको; १० दिवसांत भरपाई न दिल्यास प्रत्येक तालुक्यात आंदोलनाचा इशारा

May 14, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये प्रतिबंधित गुटख्यासह दुचाकी जप्त; शहर पोलिसांची वैराग नाका परिसरात कारवाई

May 14, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंड्यात हातचलाकीने एटीएम कार्ड बदलून ५० हजारांचा गंडा; पिठापुरीतील तरुणाची फसवणूक

May 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडीसह शेती साहित्य आणि दुचाकीची चोरी

May 14, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: निकालाची तारीख पुढे ढकलली; आता १६ जून रोजी लागणार अंतिम निकाल!

May 14, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group