• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 25, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्या आंदोलकाकडून 11 कोटी वसूल करणार

- जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर

admin by admin
November 4, 2023
in मराठवाड़ा
Reading Time: 1 min read
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्या आंदोलकाकडून 11 कोटी वसूल करणार
0
SHARES
620
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बीड – बीड शहर आणि माजलगाव मध्ये झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपीकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल अशी माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु झालेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीला देखील आग लावण्यात आली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. सुमारे 11 कोटींची वसुली आरोपींकडून करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना बीड पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर, 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

61 बसच्या दुरूस्तीचे काम सुरू
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागल्याने मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे समोर आले होते. याचवेळी बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे, बीडमध्ये जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बसेचीच मागणी पाहता तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहे.

बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित
बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं, राजकीय पक्षांची कार्यालयही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपासात देखील केला जात आहे.

144 आरोपींना अटक
बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना अटक तर 2 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. तर, 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

 

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post

तुळजापूरचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांना कोर्टाचा दणका

Next Post
परंडा : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

तुळजापूरचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांना कोर्टाचा दणका

ताज्या बातम्या

अबब! डॉक्टरांचे पथक आले तपासणीला आणि नागपूरला गेले चक्क ट्रॅक्टरने?

अबब! डॉक्टरांचे पथक आले तपासणीला आणि नागपूरला गेले चक्क ट्रॅक्टरने?

November 25, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापूर तालुक्यातील फुलवाडीत यात्रेच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

November 24, 2025
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; नराधमास २० वर्षे सक्तमजुरी व ४१,५०० रुपयांचा दंड

November 24, 2025
कळंबमध्ये निवडणुकीच्या तोंडावर तुफान राडा! पैसे वाटपावरून भाजप-काँग्रेस भिडले; डॉक्टर पतीला मारहाण तर काँग्रेसच्या तरुणाचा पाय मोडला

कळंबमध्ये निवडणुकीच्या तोंडावर तुफान राडा! पैसे वाटपावरून भाजप-काँग्रेस भिडले; डॉक्टर पतीला मारहाण तर काँग्रेसच्या तरुणाचा पाय मोडला

November 24, 2025
“राणा पाटलांचे ‘इलेक्टिव्ह मेरीट’ म्हणजे त्यांची हुजरेगिरी”; सुधीर पाटलांचा घणाघात

“राणा पाटलांचे ‘इलेक्टिव्ह मेरीट’ म्हणजे त्यांची हुजरेगिरी”; सुधीर पाटलांचा घणाघात

November 24, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group