बेंबळी पोलीस ठाण्यात दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी विजय नवनाथ क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निखिल भागवत खंडाळकर आणि ओम भागवत खंडाळकर या दोघांविरुद्ध भादंवि कलम 118(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विजय क्षिरसागर यांचे म्हणणे आहे की, आरोपींनी त्यांच्या मामाच्या मुलीशी त्यांचे लग्न झाल्याच्या कारणावरून 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता आंबाबाई मंदिर, आंबेवाडी येथे त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, फायटर आणि दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात क्षिरसागर गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अद्याप फरार आहेत आणि त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.