भूम : आरोपी नामे- नासिर सलीम झारेकरी, वय 32 वर्षे, रा. सिध्दार्थनगर कर्जत जि. अहमदनगर, 2) इरफान ईस्माईल सय्यद रा. लोहारा गल्ली कर्जत जि. अहमदनगर यांनी दि.01.06.2024 रोजी 16.30 वा.सु. परंडा ते भुमकडे जाणारे रोडवर एमआय डी सी भुम जवळ माणकेश्वर फाट्यावर ता. भुम येथे पिकअप वाहन क्र एमएच 16 एवाय 7935 मध्ये 24 वासरे व 3 म्हशीची रेडके वाहनासह असा एकुण 2,27,000 ₹ किंमतीचे वासरे व रेडके पिकअप वाहनांमध्ये चारापाण्याची अगर औषध पाण्याची सोय नसताना अरुंद जागेत दोरीने बांधून हालचाल करता येणार नाही अशा स्थितीत कतली साठी विनापास परवाना घेवून जात असताना भुम पो.ठा.च्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11(डी) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 11, 5(अ)(ब) 6, 9 प्राण्याचे परिवहन अधिनियम 1978 कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.