वाशी : फिर्यादी नामे- दत्ता परसु पवार, वय 34 वर्षे रा. ज्योतीबाचीवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी आरोपी नामे- 1)गहीनिनाथ सुखदेव देवडीकर, वय 42 रा. आडगाव ता. जि. बीड, 2) रामभाउ ई. हातवाटे, वय 36 वर्षे, रा. खुंडूस ता. जि. बीड, 3) कल्याण आश्रुबा चन्ने, वय 41 वर्षे, रा. गुंडेवाडी पो. पिंपळनेर ता. जि. बीड, 4) मे श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स को.लि. शिवजीनगर पुणे तर्फे शाखा व्यवस्थापक पहिला मजला साई पॅलेस हॉटेल समोर बीड यांचे दि. 17.02.2022 रोजी ते दि. 12.12.2022 व आज पावेतो जनहितम मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी बॅक शाख ई ता. भुम व बीड व आर टी ओ ऑफीस बीड येथे आरोपी गहिनीनाथ देवडीकर, रामभाउ हातवाटे यांचे कडून ट्रॅक्टर, डंपीग ट्रॉली व नांगर हे 6,90,000₹ ला खरेदी केले.
सदरचा वाहन खरेदीचा करारनामा ॲड नोटरी केकान जी एम जी बीड यांचेकडे रजि. नं 140/22 अन्वये नोंदवुन देवून आरटीओ एनओसी च्या नावाने जादा 2,00,000 ₹ हात उसने घेवून त्या बदल्यात बॅक ऑफ चा चेक दिला पंरतु सदर चेक न वटल्यामुळे फिर्यादीची फसवणुक केली. व सदर ट्रॅक्टर परस्पर विक्री करुन त्यावर मे श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स को. लि. शिवाजीनगर पुणे तर्फे शाखा व्यवस्थापक साई पॅलेस हॉटेल समोर बीड यांचे लोन घेवून आज पावेतो फिर्यादीचे नावावर करुन न देता 8,75,000 ₹ची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्ता पवार यांनी दि.24.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 406, 409, 418, 420, 463, 464, 465, 467, 468, 471, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे दोन गुन्हे
कळंब : फिर्यादी नामे- लखन मुंजाजी कोलगणे, वय 31 वर्षे, रा. सोन्ना ता. जि. परभणी ह.मु. शासकीय निवासस्थान प्रा. आ. केंद्र ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांचे शासकिय निवासस्थान प्रा.आ. केंद्र ईटकुर येथील राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.21.03.2024 रोजी 17.00 ते दि.22.03.2024 रोजी 08.30 वा. सु. तोडून होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 22 एएस 7725, एक एलईडी टिव्ही, लिनेव्हो कंपनीचा टॅब तसेच पांडुरंग आश्रुबा फरताडे, वय 33 रा. ईटकुर यंचे पांडुरंग मशिनरी स्टोअर्स चे दुकान उघडून दुकानातुन संलोचनचे कॅड, पक्कड, मारतुल असा एकुण 59,796 किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लखन कोलगणे यांनी दि.24.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर दत्तु साळुंके, वय 44 वर्षे, रा. थोडसरवाडी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची टिव्हीएस स्पोटर्स मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 6704 ही दि. 19.03.2024 रोजी 20.30 ते दि. 20.03.2024 रोजी 05.30 वा. सु. ज्ञानेश्वर साळुंके यांचे शेत गट नं 82 मध्ये मुळेवाडी शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर साळुंके यांनी दि.24.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.