भूम :आरोपी नामे-1) सत्तार जानु हकीम, 2) सलीमा सत्ता हकीम, 3)खालेद सत्तार हकीम, 4) कचरु रामा बनसोडे सर्व रा. भेनगिरी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 07.02.2024 रोजी दुपारी 03.45 वा. सु. सचिन मस्कर यांचे भोनगीरी बाणगंगा तळ्याचे बाजूला शेतातील शेत गट नं 93 च्या कोपीमध्ये फिर्यादी नामे- लालुबाबु दरोगा सहनी, वय 35 वर्षे, रा. हारपुर ता. धनकौन जि. शिवार ह.मु. सचिन मस्कर यांचे शेतात शेत गट नं 93 बानगंगा तळ्याचे बाजूला ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तुम्ही जर येथे कामास थांबलात तर तुमच्यावर केसेस करु असे म्हणून शिवीगाळ करुन दगड खोऱ्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लालुबाबु सहनी यांनी दि.08.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरोपी नामे-1)अशोक दशरथ शिंदे, 2) अनिता दशरथ शिंदे, 3) दशरथ राजेंद्र शिंदे, रा. कोथळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 05.02.2024 रोजी सांयकाळी 09.30 वा. सु.कोथळा येथे फिर्यादी नामे- सोनाली रामेश्वर शिंदे, वय 30 वर्षे, रा. कोथळा ता. कळंब जि. धाराशिव या व त्यांचे पती रामेश्वर हे घरासमोर उभे असताना नमुद आरोपींनी जुन्या भांडणाचे कारणावरुन रामेश्वर यांना शिवीगाळ करुन मारहाण करत असताना फिर्यादी या भांडण सोडवण्यास गेल्या असता नमुद आरोपींनी फिर्यादीच्या हातावर काठीने मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा अभिषेक व अनिकेत यांनाही नमुद आरोपींनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सोनाली शिंदे यांनी दि.08.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 325, 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरोपी नामे- 1)सुभाष मारुती चौधरी, 2) रविंद्र सुभाष चौधरी दोघे रा. वडणेर, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.08.02.2024 रोजी 16.30 वा. सु. शेत गट नं 86 मध्ये वडणेर येथे फिर्यादी नामे- हाणुमंत मारुती चौधरी, वय 60 वर्षे, रा. वडणेर, ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने बांधावर दगड टाकण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हाणुमंत चौधरी यांनी दि.08.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.