परंडा : आरोपी नामे-1)सुधीर अंबऋषी काळे, वय 35 वर्षे, रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.25.04.2024 रोजी 22.00 वा. सु. साकत बु. ते सामनगाव रस्त्यावर फिर्यादी नामे- लक्ष्मण उत्तम कदम वय 36 वर्षे, रा. शिवशंकर नगर परंडा रोड, भुम ता. भुम जि. धाराशिव यांचे भाउ नामे राम कदम यांनी नमुद आरोपीच्या पत्नी सोना काळे हिस पळवून नेल्याचे रागातुन फिर्यादीचे वडील मयत नामे-उत्तम यादव कदम, वय 60 वर्षे, रा. शिवशंकर नगर, परंडा रोड, भुम ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने उत्तम कदम यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी करुन खुन केला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे- लक्ष्मण कदम यांनी दि.26.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 302 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
धाराशिव : आरोपी नामे-1) रावण शिवाजी मोहीते, 2) शंकर रावण मोहिते, 3) कस्तुरा रावण मोहिते, 4) अक्षय रावण मोहिते, 5) ऋतिक बाळासाहेब सपकाळ, 6) किरण रमेश गायकवाड,7)राजेंद्र दत्तु मोटे, सर्व रा. देवळाली ता. जि. धाराशिव यांनी दि.24.04.2024 रोजी 21.30 वा. सु. देवळाली येथे फिर्यादी नामे-सुरेश बाबुराव धाकतोडे, वय 51 वर्षे, रा. देवळाली ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व फिर्यादीची पत्नी कमलाकर सुरेश धाकतोडे, मुलास रत्नदिप धाकतोडे, राजेश धाकतोडे, मुलांचे मित्र सुजीत विधाते यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, रॉड, ब्लेड, विटाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश धाकतोडे यांनी दि.26.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : आरोपी नामे-1)रमेश शिंदे, 2) रमेश शिंदे, 3) रमेश शिंदे, अन्य दोन इसम रा. लिंबळंक ता. बार्शी जि सोलापूर यांनी दि.25.04.2024 रोजी 23.00 वा. सु. सुख सागर बार हॉटेल येरमाळा येथे फिर्यादी नामे-वनिता विकास बनसोडे, वय 31 वर्षे, रा. कराड ता. कराड जि. सातारा ह.मु. लिंबळक ता. बार्शी जि. सोलापूर यांचे पती विकास बनसोडे व नमुद आरोपी यांचे भांडण तक्रार चालु असल्याने ते सोडवण्यास फिर्यादी व फिर्यादीची बहिण अंबीका गेले असता त्यांना नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन हातावर चावा घेवून गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वनिता बनसोडे यांनी दि.26.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 325, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.