भूम : आरोपी नामे-1)अजित शिंदे, 2) विशाल शिंदे, 3) सिध्दोधन सरवदे, 4) वैभव गायकवाड, 5) विकी जावळे व इतर सहा इसम रा. भिमनगर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 13.04.2024 रोजी 18.15 वा. सु. हॉटेल साईराज येथे फिर्यादी नामे- सचिन ज्योतीराम कांबळे, वय 38 वर्षे, रा. कुसुमनगर भुम ता. भुम जि. धराशिव यांना नमुद आरोपींने गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची मोटरसायकल फोडून नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन कांबळे यांनी दि.13.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 324, 323, 504, 427, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1) महेश मेटे, 2) उमेश मेटे, 3) निखिल मेटे, 4) लखन मेटे, 5) सतिश करंडे, 6) किशोर जांभळे, 7) राजेंद्र मेटे, 8) मयुर संतोष करंडे सर्व रा. वडगाव लाख 9) ऋतेश कवडे रा. तुळजापूर यांनी दि.08.04.2024 रोजी 20.30 ते 22.30 वा. सु.वडगाव लाख येथे फिर्यादी नामे-मयुर मोहन साळुंके, वय 26 वर्षे, वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे आजोबा महादेव मसा कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन दमदाटी करुन मारहाण करीत असताना फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता नमुद आरोपींनी त्यासही जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मयुर साळुंके यांनी दि.13.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(2),(व्ही)(अ), 3(1), (एस), 3(1) (आर) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1)सचिन शशिकांत पाटील, 2) संजू शशिकांत पाटील, 3) राजेंद्श्र शशिकांत पाटील,4) अमोल पाटील सर्व रा. लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 11.04.2024 रोजी 13.00 वा. सु.लोहगाव येथे फिर्यादी नामे- कमल नागनाथ मेंढके, वय 50 वर्षे, रा. लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कमल मेंढके यांनी दि.13.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे