• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम : मुरुम चोरीला आक्षेप घेतल्याने महिलेला जातीवाचक शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी; दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

admin by admin
July 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
407
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम –  शेतामधील मुरुमाचे अवैध उत्खनन करून ते चोरून नेण्याला आक्षेप घेतल्याच्या कारणावरून एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार भुम तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात भुम पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी दत्तात्रय साठे (वय ३६, रा. साठे नगर, भूम ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भुम येथील अलमप्रभु देवस्थानच्या पाठीमागे असलेल्या शेत सर्व्हे क्रमांक २४३/अ/१ मध्ये घडली.

फिर्यादी अश्विनी साठे यांच्या शेतातून आरोपी संदीप लष्कर आणि शिवशंकर हे दोघे मुरुमाचे उत्खनन करून अतिक्रमण करत होते. यावेळी अश्विनी यांचे पती दत्तात्रय साठे यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी त्याचा राग मनात धरला. त्यानंतर आरोपींनी अश्विनी साठे यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने २५ जुलै रोजी भूम पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी आरोपी संदीप लष्कर व शिवशंकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

अणदूर शिवारात क्षुल्लक कारणावरून महिलेला मारहाण; दागिनेही हिसकावले, पाच जणांवर गुन्हा

Next Post

येरमाळ्याजवळ ‘ताडपत्री’ टोळीचा पुन्हा धुमाकूळ? चालत्या ट्रकमधून कापड आणि खतांची चोरी

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळ्याजवळ 'ताडपत्री' टोळीचा पुन्हा धुमाकूळ? चालत्या ट्रकमधून कापड आणि खतांची चोरी

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!