• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 शेतातील मोटारीची वायर तोडल्याचा जाब विचारणे भोवले; कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, दुधोडी येथील सहा जणांवर गुन्हा

admin by admin
November 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम: शेतातील विद्युत मोटारीची वायर कोणी तोडली? असे विचारल्याचा राग मनात धरून एका ५९ वर्षीय शेतकऱ्याला सहा जणांच्या जमावाने अमानुष मारहाण केल्याची घटना भूम तालुक्यातील दुधोडी येथे घडली आहे. मारहाणीत कुऱ्हाडीच्या तुंब्याचा (दांड्याचा) वापर करण्यात आला असून, याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण नरहरी बहीर (वय ५९, रा. दुधोडी, ता. भूम) असे मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास दुधोडी गावातील देवी मंदिराजवळ घडली. फिर्यादी अरुण बहीर यांनी त्यांच्या शेतातील मोटारीची वायर तुटलेली पाहिली होती. याबद्दल त्यांनी विचारणा केली असता, याचा राग आरोपींना आला.

आरोपी रामचंद्र संपतराव महानवर, विजय रामचंद्र महानवर, दत्तात्रय देवराव महानवर, सार्थक दत्तात्रय महानवर, गणपत महादेव महानवर आणि अजित लक्ष्मण महानवर (सर्व रा. दुधोडी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून अरुण बहीर यांना गाठले. त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारून त्यांना जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर अरुण बहीर यांनी २७ नोव्हेंबर रोजी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९० आणि ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.

Previous Post

मुलीसोबतच्या भांडणात मध्यस्थी भोवली; भोसगा येथे ६५ वर्षीय वृद्धाला काठीने बेदम मारहाण, अचलेरच्या तरुणावर गुन्हा

Next Post

भरवस्तीत उघड्यावर तलवार घेऊन दहशत; उमरग्यातील साने गुरुजी नगरात तरुणावर पोलिसांची कारवाई

Next Post
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

भरवस्तीत उघड्यावर तलवार घेऊन दहशत; उमरग्यातील साने गुरुजी नगरात तरुणावर पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!