धाराशिव: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प विरोधकांना सडेतोड उत्तर देणारा आहे, असे धाराशिवचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योजनांची माहिती दिली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 600 कोटी रुपयांचा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे.
काळे म्हणाले, “विरोधक म्हणत होते की राज्यातील लाडकी बहिणीसाठी योजना करताना लाडके भावांसाठी सुद्धा करा, त्या संदर्भात केंद्र सरकारने एक कोटी तरुणांसाठी महिना पाच हजार रुपये ईस्टर्नशिप देण्याची योजना आणली आहे. यासाठी कंपन्यांना दहा टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. आवास योजना अंतर्गत तीन कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यात शहरी व ग्रामीण भागाचा समावेश आहे.”
काळे पुढे म्हणाले, “कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि इतर सर्व बाबींसाठी न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. विरोधक फक्त चर्चा करतात, मात्र विकासाच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत. लोकसभेत विरोधकांनी अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्याची गरज होती, मात्र त्यांनी तो दिला नाही हे दुर्दैव आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. ग्रामीण रस्ते सुधारण्यासाठी 400 कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे, जो अतुलनीय आहे.”
केंद्र सरकारचा अर्थविषयक धोरण सर्वांसाठी हितदायक ठरणार असून, हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे, असे नितीन काळे यांनी सांगितले.
(अधिक माहितीसाठी ‘ धाराशिव लाइव’ फेसबुक पेजला भेट द्या)