• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘स्वप्नांच्या दुनियेत हरवलेला अर्थसंकल्प’

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर आमदार कैलास पाटील यांची टीका

admin by admin
July 23, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ.कैलास पाटील

Kailsh Patil

0
SHARES
81
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: केंद्र सरकारच्या आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर धाराशिव – कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी कठोर टीका केली आहे. “बोलघेवड सरकार आणि त्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प देखील असाच स्वप्नांच्या जगात हरवून गेलेला आहे,” असे म्हणत त्यांनी या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली.

कैलास पाटील म्हणाले की, “या स्वप्नांच्या दुनियेत देशातील जनतेला फिरवून आणण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे.” निवडणुकीत ज्या राज्यात भाजप व महायुतीला लोकांनी झटका दिला, त्या राज्यात केंद्राने आकसबुद्धीने व्यवहार केल्याचे दिसून येत आहे. राज्याकडून केंद्राला विविध करातून मोठा वाटा मिळतो पण केंद्राकडून त्या प्रमाणात काहीच मिळत नाही. यंदा तर हे प्रमाण अजून कमी झालं आहे, ज्यामुळे महाराष्ट्रावरील राग व्यक्त होत आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे केंद्र सरकारने बदल्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

पाटील पुढे म्हणाले, “राजकीय पक्षाकडून सरकारमध्ये गेल्यावर चूक सुधारण्याचे प्रयत्न अपेक्षित असतात, पण हे सरकार चूक मान्य करण्याऐवजी लोकांवर राग काढत आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात नेहमीप्रमाणे वलग्नाच केल्या आहेत. शेतीमालाच्या हमीभावावर हे सरकार ब्र शब्द काढत नाहीत. उत्पादन वाढवण्यासाठी अमुक योजना या तर ठरलेल्या वाक्यांना जनतेने पाठ केले आहे. आयात निर्यात धोरणावर चकार शब्द नं काढणार सरकार दुसऱ्या बाजूला आपले सरकार टिकवण्यासाठी दोन राज्यात निधीचा वर्षाव करत आहे.”

“देश म्हणून सरकारने हा अर्थसंकल्प मांडला की सरकार वाचविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे,” असे पाटील म्हणाले. दलित, मुस्लिम, आदिवासी, तरुण, वाढती बेरोजगारी व महागाई आदी प्रश्नावर सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका देखील त्यांनी केली.

(अधिक माहितीसाठी ‘धाराशिव लाइव” फेसबुक पेजला भेट द्या)

Previous Post

तेरमध्ये जागेच्या वादावरून मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post

विरोधकांना उत्तर देणारा अर्थसंकल्प : जिल्हाध्यक्ष नितीन काळे

Next Post
विरोधकांना उत्तर देणारा अर्थसंकल्प : जिल्हाध्यक्ष नितीन काळे

विरोधकांना उत्तर देणारा अर्थसंकल्प : जिल्हाध्यक्ष नितीन काळे

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : एकाच आयडीबीआय (IDBI) बँक खात्यातून तब्बल १०.६५ कोटींचा सायबर दरोडा

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!