धाराशिव – तेर येथे जागेच्या वादावरून सहा जणांवर मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी नयुम नदिम दरवान यांनी २२ जुलै रोजी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे-जाकेरा ताजोद्दीन कोरबु, अलिम ताजोद्दीन कोरबु, कलिम ताजोद्दीन कोरबु, वकील ताजोद्दीन कोरबु, समिर ताजोद्दीन कोरबु आणि अमिन ताजोद्दीन कोरबु यांनी २१ जुलै रोजी दुपारी ११:३० ते १२:०० च्या दरम्यान मर्कज मज्जिद तेर येथे फिर्यादी नयुम नदिम दरवान आणि त्यांचे वडील नदिम दरवान यांना मारहाण केली.
आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्यांनी, काठी आणि कुह्राडीने मारून जखमी केले. मारहाणीमुळे दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११८(२), ११८(१), ११५, ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींवर कारवाई सुरू केली आहे.