धाराशिव – येथील नारायण कॉलनी, काकडे प्लॉट येथे राहणाऱ्या मनिषा नारकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घुसून दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही चोरी ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान झाली असून, चोरट्याने घरातील कपाटातील ७४ ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले.
फिर्यादी मनिषा सुनिल नारकर (वय 38) यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 07 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 7 वाजल्यापासून ते दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6.30 वाजेपर्यंत त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील सोन्याचे 74 ग्रॅम वजनाचे, 920 मिली सोन्याचे दागिने चोरीला नेले. या दागिन्यांची किंमत अंदाजे 1,55,000 रुपये इतकी आहे.
या घटनेची नोंद दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, भारतीय दंड संहिता कलम 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत
मुरुममध्ये चोरी, जवळपास ६० हजारांचा ऐवज चोरीला
मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणेगुर येथील रहिवासी प्रकाश शरणप्पा जोजन यांच्या घरात १७ सप्टेंबरच्या रात्री चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी खिडकीचा काच फोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३५,००० रुपये रोख असा एकूण ५९,२०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
प्रकाश जोजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही चोरी १७ सप्टेंबरच्या रात्री २ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. मुरुम पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५(ए) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.